मराठी सिनेसृष्टीचा सुप्रसिध्द अभिनेता भरत जाधवे ब-याच काळानंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक केलं आहे. भरत जाधव स्टारर नवी मालिका ‘सुखी माणसाचा सदरा’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. ही मालिका दसऱ्याच्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दरम्यान भरत जाधव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आनंदी क्षण सांगितला आहे.
भरत यांनी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आई-वडिलांचा पांढऱ्या रंगाच्या बससोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर त्यांनी त्याच्या आयुष्यातील आनंदी क्षण कोणता होता हे सांगितले आहे. भरत आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘आम्ही कॉलेज मध्ये एकांकिका करत असताना चंद्रलेखा नाट्य संस्थेची बस बाहेरून बऱ्याचदा बघायचो. आणि या बसमध्ये आपल्याला कधी तरी बसता येईल का म्हणून नेहमी विचार करायचो. नाटकाच्या बसमध्ये बसणं म्हणजे आम्हा नवोदितांना अप्रुप वाटायचं. नंतर ‘ऑल द बेस्ट’ आलं आणि त्याच बसने हजारो प्रयोग करत संपुर्ण महाराष्ट्रभर प्रवास केला’.
अभिनेता भरत जाधव पुढे लिहतो, " ‘ऑल द बेस्ट’ माझं पहिलं व्यावसायिक नाटक. तेंव्हा मला १०० रूपये नाईट मिळायची. त्यावेळी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की भविष्यात आपलीही एखादी नाट्य संस्था असेल आणि आपली स्वतःची नाटकाची बस असेल. २०१५ साली जेंव्हा ‘भरत जाधव एंटरटेनमेंट कंपनी’ ची पहिली बस घेतली तेंव्हा सगळ्यात जास्त आनंद आई बाबांना झाला. आपल्यामुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर खरं हास्य आणि समाधान आलं यातंच सगळं मिळवलं मी..! या कला क्षेत्राने मला अशा अगणित सुखी क्षणांची भेट दिलीये."
सध्या भरत जाधव यांची ‘सुखी माणसाचा सदरा’ ही मालिका २५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.