साडीत खुललं प्रिया बापटचं सौंदर्य, पाहा Photos

By  
on  

साजि-या-गोजि-या लुक्ससोबतच आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठी सिनेसृष्टीतील लाडकी नायिका प्रिया बापटने नुकतंच नवात्रीनिमित्त खास विविध साडीतलं  फोटोशूट शेअर केलं आहे. 

अभिनेत्री प्रिया बापटचं साडीप्रेम सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतय. साडी लुकमध्ये प्रिया बापटचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं हे तिच्या बऱ्याच फोटोंमध्ये पाहायला मिळालं आहे. 

मराठमोळ्या साजात सजलेली प्रिया या साडीत खुपच सुंदर दिसतेय. 

 

नाटक-सिनेमा आणि वेबसिरीजच्या माध्यमांतून प्रिया रसिकांच्या भेटीला येते. 

 

अभिनयासोबतच प्रियाने दादा एक गुड न्यूज आहे ह्या नाटकाची निर्मितीसुध्दा केली आहे. 

प्रियाने नवरात्रीनिमित्त नऊ दिवस विविध साड्यांमधले हे झक्कास फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

 

 

प्रत्येक साडीत प्रिया खासच दिसतेय. 

 

 

प्रियाच्या ह्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत यांची ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते. रियल लाईफ कपल असल्याने त्यांची रिल लाईफ केमिस्ट्रीही उत्तम दिसते.

 

 

प्रियाला विविध प्रकारच्या साड्या आवडतात. लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळातही प्रियाने तिचे साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले होते. 

 

Recommended

Loading...
Share