ह्या मराठी अभिनेत्रीने दस-याच्या मुहूर्तावर केली नवी सुरुवात, जाणून घ्या

By  
on  

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी दस-याचा मुहूर्त महत्त्वाचा आहे. नुकताच घरोघरी दसरा आनंद आणि हर्षोल्हासात पार पडला. अनेकांनी दस-याच्या सोनेरी दिवशी आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली. कोणी नवीन ऑफीस सुरु केलं तर कोणी नवीन गाडी तर कोणी घर घेतलं . 

मराठी सिनेसृष्टीतील एका प्रसिध्द अभिनेत्रीनेसुध्दा दस-याच्या शुभदिनी आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. पण तुम्हाला वाटेल तिने साखरपुडा वगैरा केला असावा...पण तसं अजिबातच नाहीय. मराठी मालिका, सिनेमे आणि वेबसिरीजमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी ही अभिनेत्री आहे, शिवानी रांगोळे.  शिवानीने दस-याच्या दिवशी गृहप्रवेश केला आहे. तिने तिचं स्वत:चं घर घेतलं आहे. 

 

 

शिवानीने तिच्या नावाची पाटीसुध्दा घराच्या प्रवेशद्वारावर सजवली आहे. शिवानीने घर घेतल्याचा आनंद सोशल मिडीयावरुन चाहत्यांशी शेअर केला आहे. घराच्या प्रवेशद्वारासह घराच्या बाल्कनीतल्या व्य्हूचे काही सुंदर फोटो पोस्ट केलं आहेत. पण तिने हे घर नेमकं कुठे घेतलं त्याचा उलगडा केलेला नाही. 
शिवानीच्या ह्या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

 

 

अलिकडेच शिवानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत बाबासाहेबांच्या पत्नीच्या म्हणजेच रमाबाईंच्या भूमिकेत झळकली होती. त्यानंतर इडियट बॉक्स ह्या वेबसिरीजमधूनही ती प्रेक्षकांसमोर आली, आता तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे. 
 

 

Recommended

Loading...
Share