By  
on  

साज ह्यो तुझा....प्रेग्नेन्ट धनश्री काडगावकरने शेअर केला Video

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून वहिनीसाहेब म्हणून  घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर आता आई होणार आहे. ही गोड बातमी धनश्रीने काही दिवसांपूर्वीच पतीच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांशी शे्अर केली होती. धनश्री आई होणार असल्याने तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ती सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. विविध फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांशी कनेक्ट राहते.

 

 

 

दस-यानिमित्ता खास फोटोशूटमधून चाहत्यांना शुभेच्छा दिल्यानंतर नुकतंच धनश्रीने मराठमोळ्या साजात सजून एक छान व्हिडीओ शेअर केला आहे. प्रेग्नेंट असलेली धनश्री या व्हिडीओत खुपच गोड दिसतेय. महत्त्वाचं म्हणजे निसर्ग सानिध्यात हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️️️ Shot by @bhushanpatil Make up by @madhurikhese_makeupartist Hair by @komalpashankar_makeupartist

A post shared by dhanashri kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri) on

 

चाहत्यांना धनश्रीचा हा गोड व्हिडीओ खुपच आवडला आहे.  

 

धनश्रीने यापूर्वी ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकांमध्येही काम केले आहे. पण तिला खरी ओळख मिळाली ती ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतल्या नंदिता वहिनींच्या भूमिकेमुळे. 

अलिकडेच धनश्री युवा डान्सिंग क्वीन या सेलिब्रिटी डान्स रिएलिटी शोमध्ये झळकली होती. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive