By  
on  

मालिका प्रदर्शित होण्यापूर्वीच ही जोडी ठरतेय हिट, प्रेक्षक म्हणतात ‘कारभारी लयभारी’

अनलॉकमध्ये अनेक वाहिन्यांनी नवीन मालिकेची घोषणा केली. यामध्ये झी मराठी च्या ‘कारभारी लयभारी’ ह्या  मालिकेचा समावेश आहे. विविध प्रोमोजमुळे ही मालिका सध्या चर्चेचा विषय ठरतेय. राजकीय पार्श्वभूमीवर आधारित ही मालिका आहे. ह्या मालिकेचे एकापेक्षा एक प्रोमो  लक्ष वेधून घेत आहेत. 

निखिल चव्हाण ‘कारभारी लयभारी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. तर निखिलसोबत या मालिकेत अनुष्का सरकटे त्याची नायिका साकारतेय. 
मालिका प्रदर्शित व्हायला अद्याप अवकाश असला तरी निखील व अनुष्काची जोडी मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. 

 

 

दस-याच्या निमित्ताने या जोडीने सर्वांना सोशल मिडीयावरुन शुभेच्छा दिल्या. मराठमोळ्या रुपात ही जोडी खुपच सुरेख दिसत होती. चाहत्यांनी त्यांच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला. 

निखीलने यापूर्वी लागिरं झालं जी या मालिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. तर अनुष्काने कलर्स मराठीवरील लक्ष्मी नारायण या मालिकेतून लक्ष्मी देवीच्या रुपात रसिकांची मनं जिंकली आहेत. 

 

 

या मालिकेचं दिग्दर्शन इंद्रजीत भोसले यांनी केलं आहे. मालिकेत रंगणारं राजकारण आणि त्यातून फुलत जाणारी प्रेम कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive