असा रंगला 'डोक्याला शॉट'चा ग्रँड प्रीमियर सोहळा

By  
on  

'डोक्याला शॉट' या जबरदस्त चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. या 'प्रीमियर शो' साठी मराठी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली. यात अमोल गुप्ते, रवी जाधव, शुभांगी गोखले, सुयश टिळक, ऋतुजा बागवे, आरोह वेलणकर, शिवराज वायचळ, राधिका हर्षे, स्तवन शिंदे, समीर चौगुले, बी युनिक ग्रुप  यांच्यासोबत डोक्याला शॉट चित्रपटाचे निर्माता उत्तुंग हितेंद्र ठाकूर, दिग्दर्शक शिवकुमार पार्थसारथी कलाकार प्राजक्ता माळी, रोहित हळदीकर, ओमकार गोवर्धन, गणेश पंडित संगीतकार अमितराज, श्रीकांत,अनिता आदी उपस्थित होते.

 चित्रपट पाहिल्यावर सगळ्या मान्यवरांनी फक्त एकच प्रतिक्रिया दिली ती म्हणजे 'आम्हाला हा शॉट अफलातून वाटला'. "प्रेक्षकांनी देखील या धमाल विनोदी 'शॉट'चा चित्रपटगृहात जाऊन आनंद घ्या आणि खळखळून हसा" असे आवाहन देखील यावेळी या कलाकारांनी केले.

Recommended

Share