'चला हवा येऊ द्या- होऊ दे व्हायरल' पर्वाची स्नेहल शिदम ठरली विजेती

By  
on  

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमानं फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर देश-विदेशातील प्रेक्षकांचंही निखळ मनोरंजन केलं. गेली चार वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणा-या 'चला हवा येऊ द्या' या लाडक्या कार्यक्रमाचं 'होऊ द्या व्हायरल' हे पर्व चांगलंच गाजलं. या पर्वात सामान्य स्पर्धकांनी भाग घेत प्रेक्षकांना हसवण्याचं शिवधनुष्य उचललं आणि ते लिलया पेललही.

या स्पर्धकांच्या विनोदांनी संपूर्ण महाराष्ट्र हसला तर कधी कधी या हास्यसम्राटांनी त्यांच्या परफॉर्मन्समधून सामाजिक संदेशसुध्दा दिला. महाराष्ट्राताच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या २६ स्पर्धकांमधून फक्त ६ स्पर्धकांनी महाअंतिम सोहळ्यात प्रेक्षकांसमोर त्यांची कला सादर केली.

नुकत्याच पार पडलेल्या या महाअंतिम सोहळ्यात स्नेहल शिदम हिला होऊ दे व्हायरल या पर्वाची विजेती म्हणून घोषित करणात आलं. तसंच अर्णव काळकुंदरी याने दुसरं तर प्रवीण तिखे यांनी या स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं. स्नेहल शिदम हिला एक लाखाचा धनादेस आणि चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी या विजेतेपदामुळे मिळालीय. त्यामुळे डॉ. निलेश साबळे आणि टीममध्ये स्नेहाचा आता समावेश होणार आहे .

https://twitter.com/zeemarathi/status/1102041907553882114

या महाअंतिम सोहळ्यासाठी आदेश बांदेकर, रवी जाधव, श्वेता शिंदे, प्रवीण तरडे, भाग्यश्री मिलिंद, अशोक शिंदे या कलाकारांची खास उपस्थिती होती.

Recommended

Share