लावणीवरुन राणादा आणि अंजलीबाई यांच्यात रंगला वादाचा फड

By  
on  

राणादा अचानक लावणीच्या फडात जाऊन काय पोहचला आणि इथे अंजलीबाईंच्या तावडीतसुध्दा तो चांगलाच सापडला. लावणीला आल्याचं समजताच अंजलीबाईंचा पारा चढला आणि राणादाचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. लावणी पाहायला गेला होतात, घरी या मग बघतेच तुम्हाला असे खडे बोल सुनावून अंजलीबाई तडकाफडकी निघून जातात. घरी आल्यावर राणादा अंजलीबाईंची समजूत घालण्याचा खुप प्रयत्न करतो, पण त्या काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीत.

तर दुसरीकडे गावक-यांसमोर राणादाची सद्याची परिस्थिती उघडकीस येते. तेव्हा तो सर्वांपुढे कबूल करतो की, अंजलीबाई सांगतात ते मी करतो. हे ऐकल्यावर गावकरी राणादाला बायकोचा गुलाम म्हणून चिडवतात. त्यामुळे राणादा आता प्रचंड संतापलाय. अंजलीबाई त्याचं सर्व ऐकतात हे त्याला गावक-यांना दाखवून द्यायचंय. आता यासाटी राणादा काय करणार हे पाहण्यासाठी तुम्हाला पाहावं लागेल, तुझ्यात जीव रंगला सोम. ते शनि. सं. ७.३० वा.

https://www.instagram.com/p/BuhC-WoH7nr/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

Share