……. आणि भर कार्यक्रमात प्राजक्ता गायकवाडला कोसळलं रडू, पाहा व्हिडियो

By  
on  

गेले काही दिवसापासून ‘आई माझी काळूबाई’ मालिकेसंदर्भातील वाद चर्चेत आहे. या मालिकेच्या दरम्यान अलका कुबल आणि प्राजक्तामध्ये अनेक वाद निर्माण झाले होते. प्राजक्ताच्या सेटवरील वागण्याला कंटाळून अलका यांनी या निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Leaving Aai Mazi Kalubai Serial.

A post shared by Prajakta Gaikwad (@its_prajaktaa) on

 

यानंतर अलका यांनी व्हिडियो शेअर करत प्राजक्ता विषयीचा राग व्यक्त केला आहे. प्राजक्ता ही सेटवर उशिरा येते, नखरे करते असे आरोप अलका कुबल यांनी केले होते. त्यावर प्राजक्ताने एका कार्यक्रमात भावनांना वाट मोकळी करून दिली. अलका कुबल आणि समीर आठल्ये यांच्याबाबत बोलताना प्राजक्ताला अश्रू अनावर झाले.

प्राजक्ता म्हणते, ‘मी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत दोन वर्षे काम केलं. त्यांना माझा कधीच त्रास झाला नाही.  मला बदनाम करण्यासाठी हे आरोप केले जात आहेत. माझ्या हृदयात अलका कुबल यांचं आदराचं स्थान आहे. मी त्यांना आईच्या जागी मानते.  त्या घटनेत मला शिवीगाळ झाल्यानंतर निर्मात्या म्हणून त्यांनी त्यावेळी योग्य ती भूमिका घेणं गरजेचं होतं.

केवळ मालिका पुढे चालवायची म्हणून तुम्ही अशा नराधमांना पदराआड लपवता आहात.’ या मालिकेतील मुख्य अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्या ऐवजी वीणा जगतापची निवड करण्यात आली आहे.

Recommended

Loading...
Share