By  
on  

पाणी टंचाईंचं भीषण वास्तव मांडणा-या 'एक होतं पाणी'चा पाहा टिझर

एक होता राजा, एक होती राणी, उद्या म्हणू नका... 'एक होतं पाणी' अशी हटके टॅग लाईन असणारं 'एक होतं पाणी' या आगामी मराठी चित्रपटाचे टिझर रिलीज करण्यात आला. या चित्रपटातील बालकलाकार चैत्रा भुजबळ हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत टिझर रिलीज करण्यात आला. व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज, प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ, विजय तिवारी निर्मित आणि रोहन सातघरे दिग्दर्शित 'एक होतं पाणी' हा चित्रपट पाणी समस्येसारख्या जवलंत सामाजिक विषयावर भाष्य करतो.

अलीकडेच 'एक होतं पाणी' चित्रपटाने ' अंबरनाथ चित्रपट महोत्सवा' मध्ये यंदा ६ नामांकनं मिळवलेली त्यातील २ पुरस्कारांवर म्हणजेच 'सर्वोत्कृष्ट कथा-आशिष निनगुरकर' आणि 'सर्वोत्कृष्ट बालकलाकार चैत्रा भुजबळ' या पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवण्यात यशस्वी झाले.तसेच नोएडा येथे संपन्न झालेल्या 6 व्या नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये "दखलपात्र ज्युरी पुरस्कार" मिळाला. दर्जेदार निर्मितीमूल्य, उत्तम कथानक आणि प्रतिभावान कलाकार यांचं समीकरण एकदा जुळून आलं की सुजाण रसिक-प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप ही ठरलेलीच. 'एक होत पाणी'च्या बाबतीत नेमकी हीच बाब विशेष उल्लेखनीय ठरतेय. आशिष निनगुरकर* यांच्या लेखणीतून साकारलेला हा विषय समाजाच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घालणारा असून सद्यस्थितीला धरून आहे.

'एक होतं पाणी' या चित्रपटात हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ राजू पाटोदकर, राधाकृष्ण कराळे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ आदि कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळतील. या चित्रपटाचे छायाचित्रण योगेश अंधारे यांनी केले असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

https://youtu.be/YGRg9sIvce4

एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट सांगणारा 'एक होतं पाणी; हा चित्रपट प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवा, कारण पाणी हेच जीवन आहे, अशी मोलाची शिकवण देतो.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive