By  
on  

सई आली परत ! सोशल मिडियावर शेअर केला व्हिडिओ

‘सुपरहॉट सई ताम्हणकर’ने काही दिवसांपूर्वी सोशल मिडियापासून दूर राहणं पसंत केलं होतं. पाँडिचेरीच्या शुटिंग पूर्वी तिने डिजीटल डिटॉक्सीफिकेशनचा निर्णय घेतला होता. सईचा हा निर्णय खरंतर चाहत्यांसाठी धक्कादायक होता. सध्या सईचे इंस्टाग्रामवर साढेनऊ लाखापेक्षा जास्त, ट्वीटरवर 79 हजारापेक्षा जास्त फोलोवर्स आहेत शिवाय १० लाखापेक्षा जास्त फोलोवर्स फेसबुकवर आहेत.

https://twitter.com/DreamersPR/status/1103208730634653697

यामागच कारण स्पष्ट करताना सई म्हणाली होती की, ‘ट्वीटर, इंस्टाग्राम, फेसबूक ह्यांसारख्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर मी नेहमीच सक्रिय असते. मला माझ्या चाहत्यांशी संवाद साधायला फार आवडतो. पण या धावपळीच्या जगात काही काळ स्वत:साठी मिळावा म्हणून मी डिजीटल डिटॉक्स करण्याचा निर्णय घेतला आहे. मला स्वत:ला वेळ द्यायचाय. स्वत:मध्ये काही चांगले बदल घडवून आणायचेत म्हणून मी डिजीटल डिटॉक्स करण्याचे ठरवले आहे.’

पण आता ब-याच कालावधीनंतर सईने कमबॅक केलं आहे. त्यासंबधीचा व्हिडिओदेखील तिने शेअर केला होता. त्यात तिने कमबॅक करत असल्याचं सांगिलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive