सोनाली कुलकर्णी दाखवणार आपल्या नृत्याचा जलवा!

By  
on  

तरुणांच्या दैदिप्यमान कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, 'झी युवा सन्मान' हा सोहळा झी युवा वाहिनीवर आयोजित करण्यात येत आहे. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या युवा पिढीतील आदर्श व्यक्तींचा सन्मान या सोहळयात केला जातो. काही विशेष पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात येतात. यंदाही हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. येत्या शनिवारी १४ नोव्हेंबर रोजी 'झी युवा' वाहिनीवर हा कार्यक्रम पाहता येणार आहे.

तरुणांच्या या सन्मान सोहळ्यात मराठी कलाक्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींची उपस्थिती होती. उपस्थित प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी खास परफॉर्मन्सेस सुद्धा या सोहळ्यात सादर करण्यात आले. तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने या सोहळ्यात एक धमाकेदार नृत्य सादर करतील. तिच्या दिलखेचक अदा अनुभवताना प्रेक्षकांचे मन मोहून जाणार आहे.

मराठी सिनेसृष्टीतील हि अप्सरा नेहमीच तिच्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना थक्क करते. यावेळी देखील या सन्मान सोहळ्यात तिच्या या धमाकेदार परफॉर्मन्सला प्रेक्षकांची दाद मिळेल यात शंकाच नाही. सोनालीची मराठी सिनेसृष्टीतील कारकीर्द हि यशस्वी आणि प्रेरणादायी आहे त्यामुळे या सोहळ्यात तिला कला सन्मान देऊन तिचा गौरव करण्यात आला. 

 

दैदिप्यमान तरुणांचा सन्मान आणि मनोरंजन यांचा सुंदर मिलाफ असलेला हा 'झी युवा सन्मान सोहळा' येत्या शनिवारी १४ नव्हेंबरला पाहायला विसरू नका; दुपारी १२ संध्याकाळी ७ वाजता, फक्त आपल्या लाडक्या 'झी युवा'वर!!!

Recommended

Loading...
Share