‘लागीरं झालं जी’ मधील जिजींचं निधन, शितली, अजा आणि भैय्यासाहेबांनी वाहिली भावपुर्ण श्रद्धांजली

By  
on  

लागीरं झालं जी’ च्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं होतं. त्यातील जिजीच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षक अजूनही विसरले नाहीत. जिजीची व्यक्तिरेखा साकारणा-या ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं निधन झालं आहे. कमल या बराच काळ कर्करोगाशी झुंज देत होत्या.  ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी मुख्याध्यापिका अशी कमल यांची ओळख होती.

 

 

त्यांच्या पार्थिवावर कराड येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. जिजींच्या अचानक जाण्याने ‘लागीरं झालं जी’ मधील कलाकारांजी आठवणी शेअर करत त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. 

 

 

‘जिजे ️जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुझी आठवण येत राहील गं. . भावपूर्ण श्रद्धांजली. ‘  असं म्हणत शितली साकारणा-या शिवानीने भावना व्यक्त केल्या आहेत. तर ‘जिजे , छबुडे , कमळे का ? खुप मोठी पोकळी केलीस’ असं म्हणत अभिनेता किरण गायकवाडने श्रद्धांजली वाहिली आहे.

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share