By  
on  

अभिनेत्री हेमांगी कवी नव्या घरात साजरी करतेय दिवाळी आणि पाडवा

दिवाळीच्या निमित्ताने अनेकांनी नवीन वस्तूंची खरेदी केलेली आहे. अनेकांच्या घरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. अभिनेत्री हेमांगी कवी आणि तिचे पति यांच्या यंदाच्या दिवाळीच्या आनंदाचं कारण वेगळं आहे. तर हे कारण आहे त्यांचं नवं घर. यंदा दिवाळीच्या निमित्ताने हेमांगी आणि पति त्यांच्या नव्या घरात दिवाळी आणि पाडवा साजरे करत आहेत. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोघांनी या नव्या घरात गृहप्रवेश केला. मात्र कामाच्या गडबडीत या नव्या घरात निवांत वेळ घालवता आला नाही. मात्र यंदाची दिवाळी या नव्या घरात साजरा करण्याचं हेमांगी आणि पतिने ठरवलं. याच निमित्ताने हेमांगीने या नव्या घरातील दिवाळीचे खास फोटो हेमांगीने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hemangi Kavi (@hemangiikavi)

 

हेमांगी या पोस्टमध्ये लिहीते की, "नव्या नवलाईने गृहप्रवेश हो झाला..क्षण एकच पण नाविण्याचा झाला. मुंबई सारख्या ठिकाणी घर घेणं आमच्या सारख्यांना अशक्य आहे हे खूप आधीच आमच्या लक्षात आलं होतं. म्हणून मग 'म्हाडा' मध्ये सलग 8 वर्ष प्रयत्न केल्यावर एकदाची 2016 मध्ये मला लॉटरी लागली आणि बोरीवलीत आम्हांला घर लाभलं. तोपर्यंत आम्ही भाडेतत्त्वावर कधी दादर तर कधी दहिसर मध्ये रहायलो.पण प्रत्यक्षात घर हातात यायला नोव्हेंबर 2019 उजाडलं. पझेशन चे सर्व तांत्रिक सोपस्कार आटपून आणि आम्हांला हवी तशी सजावट करून घेऊन फेब्रुवारी मध्ये आम्ही आमच्या हक्काच्या घरात 'गृहप्रवेश' केला!"  

या नव्या घरात वेळ घालवण्यासाठी आणि खास सेलिब्रेशनसाठी दोघांनी दिवाळीचं निमित्त शोधलं. आणि पाडवाही या नव्या घरात साजरा केला. पुढे हेमांगी या पोस्टमध्ये लिहीते की, " खूप काळ आम्हांला आमच्या या नवीन घरात राहायलाच मिळालं नाही किंवा कुठलेच सण नीटसे साजरे करता आलेच नाहीत.पण मग यावेळी मात्र काहीही झालं, कितीही बिझी असलो तरी 'दिवाळी' सुट्टी घेऊन आपल्या या पहिल्यावहिल्या, नवीन, हक्काच्या घरात साजरी करायचीच असं ठरवून टाकलं. यंदाची आमची दिवाळी, आमचा पाडवा या नवीन, हक्काच्या घरात साजरा करतोय! तुमचे आशीर्वाद असू द्यात! "

Author

Recommended

PeepingMoon Exclusive