By  
on  

पुढल्या वर्षी मिताली मयेकर बनणार मिसेस चांदेकर, पोस्ट केले हे फोटो

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर या कपलचं लग्न याचवर्षी पार पडणार होतं. मात्र कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे दोघांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली. आणि आता दोघं पुढील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये लगीनगाठ बांमधणार आहेत. 

मितालीने दिवाळीच्या निमित्ताने सोशल मिडीयावर सिद्धार्थसोबतचे काही खास फोटो शेयर केले आहेत. या फोटोत दोघं ट्रेडिशनल लुकमध्ये दिसत आहेत. मिताली या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीते की, "पुढच्या वर्षी मिस्टर आणि मिसेस."

तेव्हा पुढील वर्षी ही जोडी मिस्टर आणि मिसेस होणार आहे. मागील वर्षी दोघांचा साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला होता. मात्र यंदा कोरोनाग्रस्त काळात लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आलं. मराठी कलाविश्वातील ही जोडी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. सोशल मिडीयाच्या माध्यामातूनच या दोघांची मैत्री झाली होती. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं.

मिताली आणि सिद्धार्थच्या चाहत्यांनाही त्यांच्या लग्नाची उत्सुकता असणार एवढं नक्की.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive