By  
on  

पाडव्याला शर्मिष्ठा राऊतला पतिकडून मिळालं हे खास गिफ्ट

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई हे नुकतचे लग्नबंधनात अडकले आहेत. या नवविवाहीत जोडप्याचा हा पहिलाच दिवाळी सण आहे. तेव्हा यंदाची दिवाळी या कपलसाठी खास ठरली आहे. त्यातच नुकतच दोघांनी पाडवादेखील साजरा केला आहे. या सणाला पति पत्नीला खास गिफ्ट देतात. तसचं खास गिफ्ट शर्मिष्ठालाही मिळालं आहे.

तेजसने शर्मिष्ठाला खास साडी भेटवस्तू म्हणून दिली आहे. शर्मिष्ठाने सोशल मिडीयावर त्यांच्या पहिल्या पाडव्याचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

शर्मिष्ठाने आत्तापर्यंत विविध मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वातही शर्मिष्ठा स्पर्धक म्हणून दिसली होती.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive