गुरुनाथच्या स्टायलिश मायाचा हा मराठमोळा साज पाहिलात का ?

By  
on  

'माझ्या नव-याची बायको' मालिकेत लॉकडाऊननंतर  नवनवे ट्विस्ट येऊ लागले आहेत आणि रसिकांनासुध्दा ते प्रचंड आवडतायत. तुम्हाला माहितच असेल राधिका, गुरुनाथ, शनाया, सौमित्र आणि माया ही पात्र आता महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचले आहेत.

गुरुनाथ आणि मायाच्या जोडीचं षड्यंत्र सर्वांच्याच नाकी नऊ आणतात. खास करुन राधिका व सौमित्र यांच्यासाठी ही दोघं नेहमीच नेहमीच अडचणी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतात. मायाच्या कर्तबगारीवर, हुशारीवर आणि तिच्या सौंदर्यात आकंठ बुडालेला गुरुनाथ फक्त तिच्याच अवती-भवती करतो. 

गुरुनाथला मायाजालात ओढणा-या ह्या अभिनेत्रीच्या म्हणजे रुचिरा जाधवच्या फोटोंवरुन तुमची नजर हटणारच नाही. 

 

चला हवा येऊ द्याच्या दिवाळी स्पेशल भागासाठी माझ्या नव-याची बायको मालिकेतले कलाकार सहभागी झाले होते. 

 

 

या  स्पेशल भागासाठी मायाने हा मराठमोळा साजश्रृगांर केला होता. 

 

 

 

बोल्ड आणि ब्युटिफुल  रुचिरा सोशल मिडीयावर नेहमीच असक्रीय असते, तिचे नानाविविध ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करते. आता ती साकारत असलेली माया रसिक प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरते आहे. 

Recommended

Loading...
Share