मराठी सिनेसृष्टीचा हॅणड्सम हंक अभिनेता गश्मीर महाजनी नेहमीच नवनव्या प्रोजेक्टसमधून प्रेक्षकांसमोर येत असतो. अभिनयाप्रमाणेच डान्सवरही त्याचं जीवापाड प्रेम आहे. याचसोबत तो प्रचंड फिटनेफ्रिक असल्याचं पाहायला मिळतं.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून गश्मीर महाजनी नेहमीच आपल्या वर्कआऊट संदर्भातले व्हिडीओ चाहत्यांसोबत शे्अर करतो. आताही त्याने एका खास वर्कआऊटचं महत्त्व पटवून सांगितलं आहे. त्यासोबतच शॉपिंगचे फोटोसुध्दा पोस्ट केले आहेत. शॉपिंग आणि वर्कआऊट काय कनेक्शन आहे असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे.
या न्यू नॉर्मलमध्ये गश्मीर आपल्या चिमुकल्यासोबत म्हणजेच लाडक्या लेकासोबत शॉपिंगला गेला. तिकडे एक तासभर त्याने शॉपिंग केलं आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाटी त्याने त्याला चक्क आपल्या खांद्यावर उचलूनच ठेवलं होतं. या बदल्यात त्याचं छान वर्कआऊट झालं. तो खुपच समाधानी झाला.
गश्मीरच्या या अनोखा वर्कआऊटचं चाहत्यांनी मात्र भरभरुन कौतुक केलं आहे.