By  
on  

नंदिता वहिनी फेम धनश्री काडगावकरच्या डोहाळे जेवणाचे फोटो पाहिलेत का?

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील वहिनीसाहेब म्हणून  घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या घरी गोड बातमी आहे. लवकरच तिच्याकडे चिमुकला पाहूणा येणार आहेत.आपण आई होणार असल्याची ही आनंदवार्ता धनश्रीनेच  एक-दीड महिन्यापूर्वी हटके व्हिडीओ प्रदर्शित करत चाहते आणि मित्र-परिवाराला दिली होती. त्यानंतर सर्वच स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. 

धनश्री सोशल मिडीयावर ह्या काळातसुध्दा प्रचंड सक्रीय असते. नानाविविध पोस्ट आणि व्हिडीओंच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच तिने आपल्या डोहाळे जेवणाचे अप्रतिम फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

 

 

 

छान नक्षीदार जरीची साडी नेसलेली धनश्री खुपच मनमोहक दिसतेय. खास करुन तिचा ब्लाऊज लक्ष वेधून घेतोय, यशोदा माता आणि बाळकृष्णाचा फोटो असलेला हा ब्लाऊज अगदी साजेसा आहे.  

 

 

डोहाळे जेवणाचं खास आकर्षण म्हणजे स्त्रियांनी लेवलेली फुलांची आभूषणे, ह्या फुलांच्या आभूषणामुळे धनश्रीचं सौंदर्य खुललं आहे. 

 

 

पती ध्रुवेश देशमुख यांच्यासोबतचा धनश्रीचा हा फोटो खुपच गोड दिसतोय,. 

 

चाहत्यांना धनश्रीच्या डोहाळे जेवणाचे फोटो प्रचंड आवडले असून त्यांनी त्यावर लाईक्स व अभिनंदनाचा वर्षाव सुरु केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive