मराठी सिनेसृष्टीचा हॅण्डसम हंक भूषण प्रधानचे हे फोटो पाहून तुमचा जीव होईल येडापिसा

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील हँडसम अभिनेता आणि तरुणींच्या गळ्यातला ताईत म्हणजे अभिनेता भूषण प्रधान. आज भूषण प्रधानचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या काही खास फोटोंवर नजर टाकूयात. 

 

भूषण हा प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. 

अनेकदा तो चाहत्यांना फिटनेस गोल्स देत असतो. 

भूषणच्या फिटनेसचं चाहत्यांसह संपू्र्ण इंडस्ट्रीतूनसुध्दा बरंच कौतुक होतं. 

 

भूषम नेहमीच पौष्टीक खाण्याला प्राधान्य देतो. त्याचं डाएट तो नेहमी काटेकोरपणे पाळतो. 

हॅण्डसम हंक अशी ओळख निर्माण करणारा सिनेसृष्टीचा ह्या चॉकलेट बॉयवर तरुणी फिदा आहेत 

 

सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारा भूषण  हा नेहमीच विविध पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतो. 

 

अलिकडेच भूषणने टाईम्सच्या 'मोस्ट डिजाईरेबल न्यू फेसेस' या लिस्टमध्ये 24 वं स्थान पटकावलं.

 

 

अनेक मराठी सिनेमे आणि वेबसिरीजमधून भूषण नेहमीच रसिकांच्या भेटीला येतो आणि मनं जिंकतो.

 

भूषणने आपल्या कारकिर्दीची सुरुवात पिंजरा या मालिकेपासून केली. यात त्याने साकारलेला नायक सर्वांनाच भावला.

लॉकडाऊनपूर्वी भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे या जोडीचा अजिंक्य हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज होता. पण कोविड परिस्थितीमुळे आता त्याचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. 

सध्या भूषण आणि अभिनेत्री भागयश्री लिमये यांच्या रिलेशनशीपची जोरदार चर्चा रंगलीय. पण ते नक्की रिलेशनमध्ये आहेत की फक्त खास मैत्री आहे हे लवकरच आपल्यासमोर येईल.

 

Recommended

Loading...
Share