प्राजक्ता गायकवाडने उचलली खंडेरायाची 42 किलो वजनाची तलवार, पाहा Video

By  
on  

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील  राणी येसूबाईंच्या व्यक्तिरेखेमुळे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. चाहत्यांशी संवाज साधायला तिला खुप आवडतं. अनेकदा पोस्ट-व्हिडीओच्या माध्यमातून ती व्यक्त. होते. पण गेले काही दिवसांपासून ‘आई माझी काळूबाई’ मालिकेसंदर्भातील वाद चर्चेत आहे. या मालिकेच्या दरम्यान अलका कुबल आणि प्राजक्तामध्ये अनेक वाद निर्माण झाले होते आणि प्रमुख भूमिकेत असूनही प्राजक्ताची ह्या मालिकेतून एक्झिट झाली. 

पण प्राजक्ताने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण याचं कारण वेगळं आहे. प्राजक्ता नुकतीच जेजुरीला गेली होती. यळकोट यळकोट जय मल्हारच्यागजरात तिने खंडोबाचं दर्शनही घेतलं.

खंडेरायाच्या मंदिरातील तिने शेअर केलेल्या एका फोटोने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. खंडेरायाची 42 किलो वजनाची तलवार तिने उचलल्याचा फोटो व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

 

 

प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.  

 

 

 

 

प्राजक्ताचा संपूर्ण महाराष्ट्रात खुप मोठा चाहता वर्ग आहे.  

 

 

Recommended

Loading...
Share