अभिनेता चिन्मय उदगीरकर या महत्त्वाच्या कामासाठी गेला आहे राजस्थानला

By  
on  

कलाकार कलेशी समर्पित असतातच पण त्यासोबतच ते समाजभानही जपताना दिसतात. कधी कोणत्यातरी एनजीओला जोडलेले दिसतात. तर कधी रस्त्यावर उतरून गरजूंना मदत करताना दिसतात. अभिनेता चिन्मय उदगीरकरही समाजभान जपताना दिसत आहे. चिन्मय सध्या जयपुरमध्ये आहे. तिथून त्याने पोस्ट शेअर केली आहे.

 

 

आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘अमृतरूपी पाण्याविना जीव होतो बेजार, जगण्याला श्वासाइतकाच पाण्याचा आधार ! जलपुरुष मा.राजेंद्र सिंह यांच्या उपाय योजनांमुळे राजस्थान सारखा शुष्क प्रदेश देखील पाणीदार झाला आहे. नदी पुनर्जीवित करणे याबाबतच्या उपाय योजनांबाबत मा.डॉ.राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान मधील भीकमपुरा येथील किशोरी गावातील तरुण भारत संघ येथे एक शिबीरवजा कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेत सहभागी होऊन आपल्या महाराष्ट्रातील नद्या बारमाही वाहत्या कशा करता येतील याचा सखोल अभ्यास करून त्यासाठी प्रयत्न करणार आहे. या Water Rejuvenation च्या प्रयत्नात आपण सर्वांची साथ आणि सहभाग लाभेल अशी अपेक्षा करतो. "जल है, तो कल है !" चाहते अर्थातच चिन्मयच्या या निर्णयाचं कौतुक करतील यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share