'आई माझी काळूबाई'च्या सेटवरुन वीणा जगतापने शेअर केला हा सुंदर फोटो

By  
on  

'आई माझी काळूबाई' ही मालिका लॉकडाऊननंतर प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि बरीच चर्चेत राहिली. या मालिकेच्या सेटवर झालेला करोनाचा शिरकाव, त्यानंतर मालिकेतल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन व त्यानंतर मालिकेची नायिका प्राजक्ता गायकवाड हिच्यासोबतचा वाद आणि तिची मालिकेतली एक्झिट. ह्यामुळे ही मालिका साऱखी प्रकाशझोतात होती.पण  या मालिकेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होताच. त्यात अभिनेत्री वीणा जगताप ही नवी आर्या म्हणून प्रेक्षकांसमोर आली आणि ही मालिका पुन्हा नव्या जोमाने प्रेक्षकांसमोर आली. 

नवी आर्या म्हणून अभिनेत्री वीणा जगतापला रसिक प्रेक्षक भरभरुन दाद देत आहेत. काळूबाईच्या शक्तीची आणि आर्याच्या भक्तीची ही गोष्ट सर्वांनाच भावतेय. साता-यात ह्या मालिकेचं शूटींग सुरु आहे. मालिकेच्या सेटवरुन वीणाने नुकताच आई माझी काळूबाईच्या निर्मात्या आणि प्रसिध्द अभिनेत्री अलका कुबल यांच्यासोबतचा हा सुंदर फोटो शेअर केला आहे. 

आई काळूबाई साकारणा-या अलका  कुबल ह्या विविध रुपं धारण करुन आपली भक्त आर्याच्या म्हणजे वीणा जगतापच्या मदतीला नेहमी धावून येतात, असं या मालिकेचं कथानक आहे. 

 

 

 

रसिक प्रेक्षक वीणा जगताप आणि अलका कुबल यांच्या ह्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करतायत.  आत्तापर्यंत 48 हजारांहून अधिक नेटक-यांनी या फोटोला लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

Recommended

Loading...
Share