…तर प्रिया बापट चमकली असती, शाहरूखच्या ‘चक दे इंडिया’ मध्ये

By  
on  

मराठी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी खास जागा निर्माण केली आहे. बॉलिवूड सिनेमांमध्ये अनेक महत्वाच्या भूमिकाही मराठी कलाकारांनी पार पाडल्या आहेत. मुन्नाभाई एम.बी.बी.एस या सिनेमात प्रिया बापटने एक छोटीशी पण लक्षात राहणारी भूमिका केली आहे. पण या सिनेमानंतर मात्र प्रिया हिंदी सिनेमांपासून लांब राहिली.


नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्रियाने याचं कारणही सांगितलं.
मुन्नाभाई एम.बी.बी.एसनंतर प्रियाला अनेक हिंदी सिनेमांच्या ऑफरही आल्या होत्या. पण या दरम्यान प्रिया महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत होती. विशेष म्हणजे या दरम्यान तिला शाहरूखसोबत चक डे इंडियामध्ये चमकण्याची संधीही आली होती. पण शिक्षण पूर्ण करायचं असल्याने तिने ही ऑफ़र नाकारली होती.
ही ऑफ़र तिने स्वीकारली असती तर हिंदी सिनेमात आणखी एका मराठी कलाकाराचा दर्जेदार अभिनय पाहता आला असता.

Recommended

Share