Photos : पुन्हा दिसला अज्या आणि शितलीचा तोच स्वॅग

By  
on  

‘लागीरं झालं जी’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे अज्या आणि शितली. या दोघांची तिखट-गोड केमिस्ट्री अख्या महाराष्ट्राला आवडली. शितलीचा खोडकर स्वभाव, फटकळ बोलणं तर अज्याचा राग, शितलीच्या खोड्या काढण्याचा स्वभाव अनेकांना आवडला.

या मालिकेने जरी निरोप घेतला असला तरी महाराष्ट्राची ही लाडकी जोडी आजही रसिकांच्या मनात घर करुन आहे. 

 

 नितीश चव्हाण आणि शिवानी बावकर यांच्यातील रोमॅंटिक केमिस्ट्री चाहत्यांना खुप भावली. मालिकेव्यतिरिक्त दोघांनी एक रोमॅण्टिक व्हिडीओसुध्दा अलिकडेच केला होता. 

 

 

आता एका नव्या फोटोशूटमध्ये अज्या आणि शितलीचा तोच स्वॅग पाहायला मिळाला. 

 

 

शिवानी आणि नितीशचं हे फोटोशूट चाहत्यांना भलतंच आवडलं असून त्यांनी या फोटोशूटवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

Recommended

Loading...
Share