असं झालं ‘तुला पाहते रे’ मधील कलाकारांचं रियुनियन, शेअर केले फोटो

By  
on  

झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.  बघता बघता ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी  भरभरून प्रेम केले. 
'तुला पाहते रे' मालिकेने टीआरपी चे सर्व विक्रम मोडले. आता या लाडक्या मालिकेने प्रेक्षकांना गुडबाय केलं असलं तरी प्रेक्षकांच्या मनात मालिकेच्या आठवणी ताज्या आहेत.

 

 

या मालिकेतील कलाकारांनी नुकतंच रियुनियनचे फोटो शेअर केले आहेत. पुर्णिमा डे, आशुतोष गोखले, अभिज्ञा भावे, गायत्री दातार, उमेश जगताप, विक्रांत सरंजामे अर्थात सुबोध भावेही यात दिसतो आहे. याशिवाय अभिज्ञाचा भावी पती मेहुल पै आणि मंजिरी भावेही या फोटोंमध्ये दिसते आहे.

Recommended

Loading...
Share