बंगाली नववधूच्या रुपात दिसली ही मराठी अभिनेत्री, पाहा हे खास फोटो

By  
on  

अभिनेत्री सई लोकूरचा लग्न सोहळा अगदी समीप येऊन पोहोचला आहे. सई आणि तिर्थदीप या जोडीच्या हळदी समारंभानंतर त्यांच्या सीमांत पूजनाचा सोहळा पार पडला. यासाठी सई खास बंगाली नववधूच्या साजात सजली होती. या सोहळ्याचे सुंदर फोटो पिपींगमूनच्या हाती आले आहेत. 

भावी पती तिर्थदीप सोबतचे हे फोटो पोस्ट करताना सईचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सई  तिच्या भावी आयुष्याचं छान सुखचित्र पाहतेय. आज 30 नोव्हेंबर रोजी सई आणि तिर्थदीप यांचं बेळगावात लग्नसोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. 

 

 

 

'बिग बॉस मराठी' सीझन एकमुळे अभिनेत्री सई लोकूर  प्रसिध्दी झोतात आली. तिने या रिएलिटी शोमध्ये फायनलपर्यंत धडक मारली होती.  मोजकेच  नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या  उपस्थितीत सई आज बोहल्यावर चढणार आहे. 

 

 

 बिग बॉसनंतर सई मालिका किंवा चित्रपटात दिसली नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. 

Recommended

Loading...
Share