सुबोध भावेने त्याच्या मालकीणबाईंना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतला आघाडीचा अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अशी ओळख निर्माण करणारा सुबोध भावे हा सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. या लाडक्या अभिनेत्याचा सोशल मिडीयावर खुप मोठा चाहता वर्ग आहे. या माध्यमातून सुबोध सर्वांशी कनेक्ट राहतो. छोट्या  दोस्तांसाठी विविध उपक्रम राबवतो. तर कधी आपल्या आगामी प्रोजेक्ट संदर्भातल्या विविध अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहचवतो. परंतु सुबोधने नुकतीच एक खास पोस्ट केली आहे.ही पोस्ट कुठल्या प्रोजेक्ट संदर्भातली नाही तर त्याच्या मालकीण बाईंसाठी आहे. 

सुबोधच्या या मालकीणबाई म्हणजे अर्थातच त्याची पत्नी मंजिरी भावे. मंजिरीचा  आज वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने त्याने ही खास पोस्ट केली. सुबोध पोस्टमध्ये लिहतो,” मालक वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!प्रेम,प्रेम आणि फक्त प्रेम!”

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

सुबोधची पत्नी मंजिरी ही नेहमीच त्याच्यापाठी खंबीरपणे उभी असलेली पाहायला मिळते. कुटुंबासोबतच सुबोधची निर्मिती संस्था ती पाहते. मंजिरीने अनेक प्रोजेक्टसच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

मंजिरी सुबोध भावेला पिपींगमून मराठीतर्फे वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !

Recommended

Loading...
Share