सोनाली कुलकर्णीने लंडनमधून शेअर केले हे सुंदर फोटो

By  
on  

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मिडीयावर किती सक्रीय असते हे तुम्ही जाणताच. सतत नवनवे फोटोशूट, विविध अपडेट्स ती या माध्यमांतून चाहत्यांपर्यंत पोहचवते.

सध्या सोनाली आगामी सिनेमाच्या शूटींगसाठी लंडनमध्ये आहे. ‘डेट-भेट’ असं तिच्या या नव्या-को-या सिनेमाचं नाव आहे. लेखक-अभिनेता हेमंत ढोमेसह ती स्क्रीन शेअर करताना दिसेल. लंडनमधल्या या सिनेमाच्या सेटवरुन अनेक फोटो सोनाली चाहत्यांशी शेअर करते.

 
आत्तासुध्दा  तिने असेच पिवळ्या स्वेटशर्टमधले सनशाईन करणारे तिचे मनमोहक फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 


 

सोनालीचा हा सोनसळी अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला असून त्यांनी या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

सर्वांनाच आता सोनालीच्या परदेशात चित्रित होणा-या सिनेमाच्या फर्स्ट लुकची उत्सुकता लागून राहिली आहे.

Recommended

Loading...
Share