टेलिव्हिजनवरचा हा अभिनेता अडकला लग्नबंधनात , पाहा Photo

By  
on  

टेलिव्हीजनवर सध्या विविध विषयांवर मराठी मालिका पाहायला मिळतात. यातच 'प्रेम पॉइजन पंगा' ही मालिका लक्षवेधी ठरली. एका नागीण आणि सामान्य मुलाची प्रेम कहाणी यात पाहायला मिळाली.या मालिकेतला चॉकलेट बॉय नायक म्हणून करण बेंद्रे घराघरांत पोहचला. करण नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. सोशल मिडीयावर त्याच्या लग्न सोहळ्याचे शानदार फोटो पाहायला मिळतायत. 30 नोव्हेंबर रोजी करण आणि निकीता नारकर यांचा विवाहसंपन्न झाला. 

दोन महिन्यांपूर्वीच 25 ऑक्टोबरला करणचा थाटात साखरपुडा पार पडला होता. आपली कॉलेजपासूनची प्रेयसी निकिता नारकरसोबत करण लग्नबेडीत अडकला. 

करणने हिंदी-मराठीतील 30 पेक्षा जास्त एकांकीकांमधून लक्षवेधी अभिनय साकारत बक्षिसं पटकावली आहेत. 

 

'अनन्या' या रंगभूमीवर गाजलेल्या नाटकात करणने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्याच्या साखरपुड्यासाठी अनन्याची संपूर्ण टीम ऋतुजा बागवे, अनघा भांगरे, प्रताप फड आदींनी उपस्थिती लावली होती. 

करणची पत्नी निकिता ही कलाक्षेत्राशी निगडीत नसून ती कुलाब्याच्या इंडीयन नेव्हीच्या एचआर डीपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. 

Recommended

Loading...
Share