संतोष जुवेकर म्हणतो, ‘आखिर आपून भी family हैं भाई लोग’

By  
on  

अभिनेता संतोष जुवेकर सध्या लंडनमध्ये आहे. अभिनेता- लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या आगामी सिनेमाचं लंडनमध्ये शूटींग सुरु झालं आहे. लोकेश गुप्ते या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. तर संतोष जुवेकरसोबत सोनाली कुलकर्णी आणि हेमंत ढोमेही या सिनेमात आहेत. डेट भेट असं या सिनेमाचं नाव आहे. 

 

 

संतोषने नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये तो एक्सरसाईज करताना दिसतो आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये संतोष म्हणतो, ‘आला मोठा मी लंडन मधे आहे मी लंडन मधे आहे सांगतोय सतत.... काय मोट्टा तिर नाय मारलास". असं कुणी म्हणालं तरी चालेल मला वाटलं आणि तुमची आठवण आली म्हणून हा video केला आणि टाकला बास्स.

आहो इथे आल्या पासून घरच्यांशी, मित्रांशी video call वर बोलतो त्यांची खुशाली विचारतो तर मग तुम्हां सर्वांची खुशाली नको विचारायला? आखिर आपून भी family हैं भाई लोग!! भेटूया लवकरच 2021 मधे माझ्या 2नवीन बाळानं सोबत.’  संतोषला पुन्हा स्क्रीनवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतील यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share