By  
on  

अखेर सिध्दार्थ चांदेकरने पूर्ण केलं ललित प्रभाकरने दिलेलं हे चॅलेंज

करोना संकट आणि लॉकडाऊनमुळे गेले पाच-सहा महिने ठप्प असलेली सिनेमागृह आता पुन्हा खुली झाली आहेत. अर्थातच यासाठी परवानगी देताना केंद्रसरकारने काही  कठोर नियमावलीसुध्दा आखून दिली आहे. पण एकप्रकारे सिनेमागृह व्यावसायिकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी मात्र ही आनंदाचीच बाब आहे. अनेकांचे रोजगार हे सिनेमागृहांवर अवलंबूून आहेत. 

केंद्र सरकारनं देशभरात  ५० टक्के क्षमतेसह चित्रपटगृहं सुरु करण्यास मान्यता दिली आहे. सुरक्षेची सर्व खबरदारी हयात घेण्यात येत आहे. पण करोनामुळे अद्याप सर्वांमध्ये असुरक्षिततेची भिती आहे. म्हणून अद्यापही प्रेक्षकांची पावलं सिनेमागृहाकडे वळत नाहीत. त्यामुळेच थिएटर्स वाचविण्यासाठी  आणि ती पूर्वपदावर आणण्यासाठी  आता कलाकारांनी मोहीम सुरु केली आहे. 

काही दिवसांपूर्वी थिएटरमध्ये जाऊन सिनेमाचा आनंद घेण्यासाठी अभिनेता ललित प्रभाकरने अभिनेता सिध्दार्थ चांदेकरला नॉमिनेट कैलं होतं. सिध्दार्थने नुकतंच सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहिला व तिथला फोटो शेअर करत हे  चॅलेंज पूर्ण केलं. तो म्हणतो, सिनेमा हा सिनेमागृहात बघायलाच हवा. आपल्या आयुष्यातले 3 तास वेगळं आयुष्य जगूया.

ललितनेही सिध्दार्तच्या या पोस्टवर सिध्दूभाई कमालच असं म्हणत प्रतिक्रीया दिली आहे. 

 

 

 ललित प्रभाकर  सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात गेला होता. तिथला सेल्फी पोस्ट करत ललितने लिहलं होतं, " सुरक्षेची सर्व खबरदारी इथे घेतली गेली..सिनेमाची खरी मजा तो सिनेमागृहात पाहण्यातच आहे. सिनेमागृहात सिनेमा पाहण्यासाठी मी नॉमिनेट करतोय, अमेय वाघ, वैदही परशुरामी, मृण्मयी गोडबोले, सोनाली कुलकर्णी आणि आदित्य सरपोतदार यांना" 

Recommended

PeepingMoon Exclusive