साडीत खुललं अभिनेत्री सायली संजीवचं सौंदर्य, पाहा Photos

By  
on  

अभिनेत्री सायली संजीव ही 'काहे दिया परदेस' या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. या मालिकेनंतर सायली जरी मराठी सिनेमांमध्ये मोठ्या दिमाखात झळकत असली तरी तिने लॉकडाऊननंतर  सुबोध भावेची निर्मिती असलेल्या शुभमंगल ऑनलाईन या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन केलं.

सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या सायलीने नुकतेच तिचे साडीतले मनमोहक फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

या साडीत सायलीचं सौंदर्य खुपच खुलून दिसतंय. 

 

 

आता ती गोष्ट एका पैठणीची, सातारचा सलमान, बस्ता या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.  लॉकडाऊनपूर्वी सायलीचा अमिताभ बच्चन यांचा गेस्ट अपिअरन्स असलेला एबी आणि सीडी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर झळकला.

Recommended

Loading...
Share