By  
on  

भरत जाधव यांनी रंगमंचावर परतल्यानंतर असा व्यक्त केला आनंद

सध्या सगळीकडे कोरोनाविषयी बोललं जात आहे. यापासून स्वत:ची काळजी कशी घ्यावी याविषयीचे मेसेज कानावर पडत आहेत. कलाकार मंडळीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून काळजी घेण्याचं आवाहन करताना दिसतात. एकीकडे नाट्यगृह, सिनेमागृह बंद असल्याने, विविध मोठे कार्यक्रम रद्द् झाल्याने त्याच्या फटका अनेकांना बसला. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

पण आता हळूहळू का होईना सगळ्याला सुरुवात होते आहे. नाट्यगृह सुरु होऊन नाटकांना सुरुवात होणार आहे. अभिनेता भरत जाधव यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. आपल्या पोस्टमध्ये भरत म्हणतात, ‘वेळ ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तिथे आपली मर्जी चालतं नाही. जस झाडाला एकदम भरपूर पाणी घातलं म्हणजे त्याला पटकन फळ येत अस नाही. ते त्याच्या 'वेळेनुसार च' येणारं.तसचं काही गोष्टी स्थिर-स्थावर व्हायला आपला एक वेळ घेतात. जी वेळ कोरोना ने घेतली. या कोरोना च्या संकटातून आपली पुर्ण सुटका झाली नसली तरी आपण बऱ्यापैकी आता पूर्ववत झालोय. सर्व गोष्टींची काळजी आणि दक्षता घेऊन ८ महिन्यानंतर आता पुन्हा रंगमंचावर एन्ट्री घेतोय. आता नाटक अनलॉक होतंय..!!’ भरत जाधव पुन्हा ‘सही रे सही’ नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive