म्हणून एका दिवसासाठी लंडनहून भारतात अप्सरेने केलं अप-डाऊन

By  
on  

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या विविध लुक्समुळे नेहमीच चाहते घायाळ होतात. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणी ही लाडकी अप्सरा चाहत्यांसाठी नेहमीच विविध गेट-अप्समधल्या फोटोशूटची पर्वणी चाहत्यांसाठी घेऊन येते. 
 

सोनालीने आत्तासुध्दा साडीतलं एक अप्रतिम फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. हे फोटोशूट इतर फोटोशूट पेक्षा जास्त खास आहे, कारण डान्सिंग क्वीन्सच्या परिक्षकपदी विराजमान झालेली सोनाली या शोच्या एका भागासाठी थेट लंडनहून आली होती आणि शूट पूर्ण होताच ती पुन्हा लंडनला परतली. 

 

 

सोनाली सध्या लंडनमध्ये अभिनेता-लेखक हेमंत ढोमेसह तिचा आगामी सिनेमा ‘डेट-भेट’चं शूटींग करतेय. यात ती बरीच व्यस्त आहे. तर इथे तिचा डान्सिंग क्वीन हा शोसुध्दा सुरुय. त्यामुळे तिला ही एक दिवसाची लंडन-भारत ही वारी करावी लागली. 

 

 

नेहमीप्रमाणेच सोनालीचं हे साडीतलं स्टनिंग फोटोशूट पाहून चाहते फिदा झाले असणार यात शंका नाही. 

 

 

सोनालीच्या  या खास फोटोशूटवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव सुरु आहे. 


 

Tags

Recommended

Loading...
Share