लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रसिध्द दिग्दर्शक रवी जाधव यांची खास पोस्ट

By  
on  

हल्ली सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यातल्या खास क्षणांबद्दल जाणून घेण्याची संधी मिळते. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा मग एखादी गोड आठवण सेलिब्रिटी या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवतात. 

मराठी सिनेमांचे प्रसिध्द दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांनी आपलं अढळ  स्थान सिनेसृष्टीत निर्माण केलं आहे. ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘बालक-पालक’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास-२’, ‘न्यूड’ असे एकापेक्षा एक सिनेमे रसिक प्रेक्षकांना देणारे रवी जाधव आता एक निर्माते म्हणूनही ओळखले जातात. आज दिग्दर्शक रवी जाधव व त्यांची पत्नी मेघना जाधव यांच्या लग्नाचा 22 वा वाढदिवस आहे. 

रवी जाधव आणि मेघना जाधव हे इंडस्ट्रीतलं एक परफेक्ट कपल म्हणून ओळखले जातात. कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच रवी जाधव यांना मेघना यांची खंबीर साथ लाभली आहे. म्हणूनच अनेकदा रवी यांच्या सोशल मिडीया पोस्टच्या माध्यमातून ते मेघना यांच्याविषयी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करताना पाहायला मिळतात.

ही पोस्ट शेअर करताना रवी जाधव म्हणतात, लग्नाच्या 22 व्या वाढदिवसाच्या बरोब्बर 22 सेकंद आधी मी हे फोटो अल्बमधून क्लिक केले आहेत. 

 

 

टीम पिपींगमून मराठीतर्फे रवी जाधव आणि मेघना जाधव यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ! 

Recommended

Loading...
Share