Photo : ' झोंबिवली'चे हे अवली तुम्ही पाहिलेत का ?

By  
on  

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती, महत्त्वाची काळजी घेऊन अनलॉकमध्ये हॉरर कॉमेडी जॉनर असलेला ‘झोंबिवली’ या मराठी सिनेमाचं शूटींग पूर्ण झालं. अनोखी कथा आणि वेगळ्या विषयांवर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी कारणीभूत ठरला कारण हा पहिला मराठी हॉरर कॉमेडी सिनेमा आहे ज्यात झोंबिज दिसणार आहेत. सुप्रसिध्द सिनेदिग्दर्शक आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

या ‘झोंबिवली’च्या अवलियांनी नुकताच एक तिघांचा झक्कास फोटो सोशल मिडीयावर चाहत्यांशी शेअर करत सिनेमाबाबतची उत्सुकता वाढवली आहे. पुढील वर्षी मराठी प्रेक्षकांसाठी एक आगळा वेगळा अनुभव घेऊन येत आहे 'झोंबिवली' हा सिनेमा. 

 

 

सर्वांनाच आता 'झोंबिवली' सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागून राहिली आहे.  

 

Recommended

Loading...
Share