या मराठी अभिनेत्रीने शेअर केला बालपणीचा गोड फोटो, ओळखलंत का तुम्ही?

By  
on  

‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेत साधी भोळी रेश्मा साकारणारी अभिनेत्री सखी गोखले महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. अभिनेते मोहन गोखले व अभिनेत्री शुभांगी गोखले यांची सखी लाडकी लेक. तिने मालिका व नाट्यविश्वात स्वत:ची आज ओळख निर्माण केली आहे. आई-बाबांसारखीच अभिनय क्षेत्राची आवड असणारी सखी एक उत्तम छायाचित्रकारसुध्दा आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg)

 अनेकदा सखी गोखले आपल्या बाबांच्या आठवणीत भावूक होते. त्यांच्यासोबतच्या आठवणी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर करते. आत्तासुध्दा सखीने तिच्या बालपणीचा एक सुरेख फोटो शेअर केलाय. सखीचा हा बालपणीचा निरागस फोटो पाहून अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg)

 

 

सखीने सहअभिनेता सुव्रत जोशीसोबत गेल्यावर्षी लग्नगाठ बांधली. सध्या हे सेलिब्रिटी कपल लंडनमध्ये वास्तव्यास आहे. सखी सोशल  मिडीयावर सतत सक्रीय असते. अनेक आठवणींना उजाळा देते.

 

सखी आपल्या पुढील शिक्षणानिमित्ताने  काही काळ लंडनमध्येच वास्तव्यास होती. त्यानंत पती सुव्रत जोशीसुध्दा लॉकडाऊनच्या काळात सखी सोबत होता. आता ही सेलिब्रिटी जोडी पुन्हा भारतात परतली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg)

Recommended

Loading...
Share