पुन्हा गरजणार मराठी बिग बॉसचा आवाज, लवकरच येतोय दुसरा सीझन

By  
on  

मराठी रसिकांच्या मनात अल्पावधीतच जागा मिळवलेला शो म्हणजे मराठी बिग बॉस. या शो ला महेश मांजरेकरांचं दमदार सूत्रसंचालनाची साथ होती. त्यामुळे या शोला प्रचंड लोकप्रियता मिळाली. नेमकं हेच हेरून कलर्स मराठी वाहिनीने या शोच्या दुस-या पर्वाचं सुतोवाच केलं आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाची झलक ट्विटरद्वारे शेअर करण्यात आली आहे. ‘तो परत येतोय’ म्हणत या कार्यक्रमाचा नवीन लोगो प्रदर्शित करण्यात आला आहे.

https://twitter.com/ColorsMarathi/status/1107281681759772672

या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा कुणाकडे असेल हे देखील समजू शकलेलं नाही. तसच या कार्यक्रमात कोण कोण स्पर्धक असतील याबद्दल वाहिनीकडून लवकरच ख़ुलासा केला जाईल. माग़ील पर्वात मेघा धाडेने पहिल्या मराठी बिग बॉसचं विजेतेपद पटकावलं होतं.

Recommended

Share