रवी जाधव यांचं अनोखं होळी सेलिब्रेशन पाहिलत का, यांच्या रंगात रंगले रवी जाधव

By  
on  

अजून होळीला पुरती सुरूवात देखील झाली नसेल. पण कलाकारांच्या होळीला मात्र केव्हाची सुरूवात झाली आहे. होळी हा सण आनंदाचा उत्साहाचा आहे. एकमेकांवरील राग विसरून सर्वानी एकाच रंगात रंगण्याचा सण म्हणजे होळी. होळीच्या सेलिब्रेशनला सुरूवात झाली आहे. दिग्दर्शक, अभिनेता रवी जाधव यांनीही त्यांच्या होळी सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे. रवी यांनी हे सेलिब्रेशन ठाण्यातील ‘जिद्द’ शालेतील ‘स्पेशल’ मुलांसोबत केलं आहे. हे फोटो रवी यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना ते म्हणतात, ‘अस्सल निरागस हसणे केवळ इथे पहायला मिळते. आमची ठाण्यातील ‘जिद्द’ शाळेतील ‘स्पेशल’ रंगपंचमी. कारण आपण सगळेच ‘स्पेशल’ आहोत!!! ‘ रवी यांनी ‘कच्चा लिंबू’ सिनेमात स्पेशल मुलाच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

 

Recommended

Share