गायक अवधूत गुप्तेंचा दुबईत होळीचा जल्लोष, म्हणतायत 'बुरा न मानो होली है'!

By  
on  

गायक-दिग्दर्शक आणि निर्माता अवधूत गुप्ते म्हटलं की जोशपूर्ण व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर येतं, नुकतंच त्यांनी दुबईत होळीनिमित्त आपल्या गाण्यांनी एकच कल्ला केला. सातासमुद्रापार दुबईतील प्रसिध्द बॉलिवूड पार्कमध्ये अवधूत यांनी दिवसभर आपल्या गाण्यांनी दंगा केला. या जल्लोषाचे फोटो त्यांनी आपल्या सोशल मिडीयावर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

नुकतंच  १५ मार्च रोजी दुबईतील बॉलिवूड पार्कमध्ये होळीच्या निमित्ताने कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. यात मराठीतील लाडके गायक-संगीतकार अवधूत गुप्ते आणि गुजराती दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक यांची खास उपस्थिती होती. यावेळी दुबईकरांना रंगाच्या उधळणीसोबत मराठी व गुजराती गाण्यांचा मनमुराद आनंद लुटता आला.

https://www.instagram.com/p/BvJwW3EhNFP/

या फोटोसह अवधुत गुप्ते म्हणतात, "हे बुरा न मानो होली है. लव यू दुबईकर्स. तुम्ही सगळ्यांनी मला थक्क केले. बॉलिवूड पार्क्स दुबईने मला एवढी चांगली संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे."

https://www.instagram.com/p/BvIziWVDpDu/

Recommended

Share