'चला हवा येऊ द्या' मध्ये दिसला आमीर आणि किरणचा मराठमोळा लूक

By  
on  

मराठी जनांमध्येच नाही तर सर्वभाषिकांमध्ये लोकप्रिय असलेला शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या शोने रसिकांना खळखळून हसण्यास भाग पाडलं आहे. या शोमधील सगळे स्कीट प्रत्येकालाच भावतात. या शोचा हुकमी एक्का म्हणजे भाऊ कदम. विनोदाच्या परफेक्ट टायमिंगने प्रत्येकांना खळखळून हसवणं भाऊला सहज जमतं. त्यामुळेच या शो चा टीआरपी वाढतो. या शोमध्ये आजवर अनेक पाहुण्यांनी हजेरी लावली आहे. पण एक खास फोटो भाऊने इन्स्टग्रामवर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/BvOAC08Afdx/?utm_source=ig_web_copy_link

भाऊच्या या फोटोत मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याच्यासोबत फोटो शेअर केला आहे. यात आमीर खान मराठमोळ्या पेहरावात दिसत आहे. तर किरणही नथ आणि नऊवारी या लूकमध्ये मराठमोळा लूक दिसत आहे. आता 'चला हवा येऊ द्या'चा हा विशेष भाग कधी प्रसारित होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. डोक्यावर टोपी, सदरा लेंगा अशा वेषात आमीर दिसत आहे. या फोटोला बरेच लाईक्स मिळत आहेत.

 

Recommended

Share