
सैराटची आर्ची म्हणून अभिनेत्री रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचली. पदार्पणातीलच सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं. अभिनेत्री रिंकू राजगुरु आता सिनेविश्वात तिची वेगळी ओळख बनवू पाहतेय. आर्ची नाही तर रिंकू राजगुरु अशी तिची ओळख हळूहळू होताना दिसत आहे. स्वत:चीच नवी ओळख ती प्रस्थापित करतेय. नवनव्या प्रोजेक्ट्समधून ती चाहत्यांसमोर येते.
मराठीसोबतच हिंदीतही रिंकूचा खुप मोठा चाहतावर्ग आहे.
सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी रिंकू आपल्या अदांनी चाहत्यांना नेहमी घायाळ करते.
'हंड्रेड' या वेबसिरीजनंतर रिंकू ओटीटीवर पुन्हा नव्या सिनेमात दिसली.. 'अनपॉज्ड' या सिनेमात हिंदीतल्या अनेक बड्या कलाकारांसोबत रिंकूने स्क्रीन शेअर केली.
तसंच लॉकडाऊननंतर रिंकूने लंडनमध्ये छुमंतर या आगामी मराठी सिनेमाचं शूटींग पूर्ण केलं. यात तिच्यासोबत बालकलाकार श्रीनिवास पोकळे, अभिनेता सुव्रत जोशी, ऋषी सक्सेना आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे झळकणार आहे,