By  
on  

सोनाली कुलकर्णी आणि आदिनाथ कोठारे ह्यांचं वेडिंग कलेक्शनसाठी खास फोटोशूट

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि सर्वात आनंदाचा दिवस. हा दिवस अविस्मरणीय कसा ठरेल यासाठी वधू-वर दोघांचीही धडपड सुरु असते. पण सर्व तयारीत अत्यंत महत्त्वाचा आणि त्या दिवसाला कायम आठवणीत ठेवण्यासाठी असतो तो दोघांचाही पोशाख. सध्या सर्वत्र लग्नसराईची धामधूम सुरु आहे. म्हणूनच वधू-वरांसाठी मार्गदर्शक ठरणारं सोनाली कुलकर्णी आणि आदिनाथ कोठारे ह्यांचं वेडिंग कलेक्शनसाठी हे खास फोटोशूट तुम्ही पाहायलाच हवं

गडद लाल रंगांचा हा भरजरी लेहंगा परिधान केल्यामुळे सोनालीचं सौंदर्य खुलून दिसंतय.

सोनाली कुलकर्णी आणि आदिनाथ कोठारे हे दोघंही सेलिब्रिटी वधू-वराच्या पोशाखात खुपच भारदस्त आणि शोभून दिसतायत.

नववधूसाठी सोनालीचा हा मनमोहक लूक नक्कीच प्रभावित करणारा ठरेल यात शंका नाही.

यंदा लग्नबंधनात अडकणा-या वधू-वरांसाठी सोनाली आणि आदिनाथचं हे खास फोटोशूट त्यांना भरपूर मदत करेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive