By  
on  

अभिनेता पुष्कर जोग दिसणार वेबसिरीजमध्ये, सोशल मिडियावर केला फोटो शेअर

बिग बॉसच्या पहिल्या सीझनमधून प्रकाशझोतात आलेलं नाव म्हणजे पुष्कर जोग. बिग बॉसनंतरही सई लोकूरसोबतच्या मैत्रीमुळे चर्चेत आला होता. नुकताच त्याचा ‘ती अ‍ॅण्ड ती’ हा सिनेमा येऊन गेला. या सिनेमात तो प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णीसोबत दिसला होता.

https://www.instagram.com/p/BvbLqERF6k4/?utm_source=ig_web_copy_link

पुष्कर आता नव्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे. पुष्कर आता वेबसिरीजच्या माध्यमातून रसिकांच्या समोर येत आहे. पुष्करने नुकतंच त्याच्या सोशल मिडिया अकाउंट वरून ही बातमी शेअर केली आहे. ती अ‍ॅण्ड ती या सिनेमाचा दिग्दर्शक विराजस कुलकर्णी आणि जीत अशोक दिग्दर्शित करत असलेल्या या वेबसिरीजचं नाव अजून जाहीर केलेलं नाही. या वेबसिरीजमध्ये पुष्करसोबत शिवानी रांगोळे आणि शिवराज वायचळ यांच्या भूमिका आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive