
2020 वर्षं आपल्या प्रत्येकासाठी आव्हानात्मक ठरलं. करोनाने न भूतो न भविष्यती अशा घटना पाहायला लावल्या. आपल्यापैकी प्रत्येकाचेच बेत यावेळी करोनाने कॅन्सल करायला लावले. या यादीत अनेक लग्नाळू सेलिब्रिटीही होते. या सेलिब्रिटींनी करोनाकाळात शॉर्टकट लग्न न उरकता थांबणं पसंत केलं. पाहुयात यावर्षी कोण कोण चढणार आहे बोहल्यावर......
सोनाली कुलकर्णी- कुणाल बेनोडेकर: 2020च्या फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा साखरपुडा पार पडला होता. लॉकडाउनच्या काळात सोनालीने याविषयीची गुड न्यूज सोशल मिडीयाच्या माध्यमातून सगळ्यांना दिली होती. ही जोडी या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकते आहे.
मानसी नाईक –प्रदीप खरेरा: मानसी आणि प्रदीप ही सुपर हॉट जोडी ही जोडी 2020 लग्नगाठ बांधणार होती. पण करोनाच्या प्रभावाने हे दोघंही नव्या वर्षी 19 जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकतील. 18 जानेवारी रोजी मानसी-प्रदीपचा मेहेंदी आणि संगीत सोहळा पार पडणार आहे. लग्नाच्या दिवशी सकाळी हळदी समारंभ पार पडणार आहे.
मिताली मयेकर – सिद्धार्थ चांदेकर: अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. ही जोडी सध्या केळवण एंजॉय करताना दिसते आहे.
अभिज्ञा भावे- मेहुल पै: अभिनेत्री अभिज्ञा भावे या वर्षी प्रियकरासोबत लग्नगाठ बांधणार असून लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. अभिज्ञा मेहूल पै सोबत लग्नबंधनात अडकणार आहे.