'कबीर सिंग'मधील मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोमुळे सोशल मिडीयावर उडालीय खळबळ

By  
on  

नवीन वर्षात म्हणजेच 2021 सालात आपण पदार्पण केलं आहे. या नव्या वर्षाकडून सर्वांना ब-याच अपेक्षा आहेत. नव्या वर्षात काहीतरी हटके करण्याचा प्रत्येकाचा संकल्प असतो. आपलीच चाकोरी किंवा आपणच आपल्यावर घातलेले निर्बंध मोडण्याचा प्रयत्न करण्यात येतो. अशीच एक चाकोरी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने मोडली आहे. तिची सोशल मिडीयावरची पोस्ट तुम्ही आ वासून पाहात राहाल. 

कबीर सिंह या सिेनमात अभिनेता शाहीद कपूरची मोलकरीण आठवतेय....छोटाच सीन होता पळण्याचा तीच अभिनेत्री वनिता खरात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी शोमध्येसुध्दा वनिता धम्माल स्कीट्सचं सादरीकरण करते. याच वनिताने चाकोरी मोडत तिचा बोल्ड फोटो शेअर केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @vanitakharat19

 

वनिता खरातने शेअर केलेला हा बोल्ड फोटो फक्त शाब्दिकरित्या बोल्ड नसून तो वैचारिकदृष्ट्या ही बोल्ड आहे. आपल्या वजनाचा न्यूनगंड कुठेही न बाळतगता वनिता खरातने हा फोटो शेअर केला आहे. 

वनिता खरातने इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना यासोबत एक पोस्टही लिहिली आहे. वनिता म्हणते की,'मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीरावर अभिमान आहे ... कारण मी मी आहे...!!!

प्रसिध्द सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुरकरने वनिताचं हे फोटोशूट केलं आहे. 

वनिताचा ह्या बोल्ड फोटोची पोस्टच सर्वच आघाडीच्या अभिनेत्रींनी आपल्या सोशल मिडीयावरुन केली आहे. सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे, प्राजक्ता  माळी यांनी वनिताचा हा फोटो पोस्ट करत प्रेरणादायी संदेश दिला आहे. 

Recommended

Loading...
Share