सई ताम्हणकरच्या घरी सिध्दार्थ-मितालीचं पार पडलं शानदार केळवण

By  
on  

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा अभिनेत्री मिताली मयेकरसोबत लवकरच लग्नबंधनात अडकतोय. मराठी सिनेविश्वातली ही एक प्रसिध्द आणि बहुचर्चित जोडी आहे. सध्या त्यांच्या केळवणाचा कार्यक्रम जोरदार सुरु आहे. कलाविश्वातील अनेक कलाकारांच्या घरी त्यांना अगत्याचं आमंत्रण आहे. नुकतंच मराठीतील आघाडीची बोल्ड आघाडीची आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकरच्या घरी सिध्दार्थ-मितालीचं केळवण झोकात पार पडलं. 

सईने खास स्वत: सिध्दार्थ-मितालीसाठी सुंदर स्वयंपाक केला होता. त्याचा आस्वाद घेतल्यानंतर सिध्दार्थने तिघांचा फोटो शेअर करत चाहत्यांना सांगितलं, सुशिक्षित सुंदर सुग्रण मुलीच्या हातचं जेवण.काय स्वयंपाक होता यार.

सिध्दार्थच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

 

 

लग्नाआधी वधू-वरांसाठी केलं जाणारं केळवण हे तर सगळ्यांनी एकत्र भेटण्याचं निमित्त असतं. वधू-वरांच्या आवडीचे पदार्थ करून जेवणासाठी आमंत्रित केलं जातं. त्यानंतर एखादी भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या जातात. 

२०१९ मध्ये सिद्धार्थ-मितालीचा साखरपुडा पार पडला. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये आहेत. 

 

Recommended

Loading...
Share