माधुरीच्या ‘१५ ऑगस्ट’चं स्क्रिनिंग, या कलाकारांनी लावली हजेरी

By  
on  

बकेट लिस्टनंतर माधुरी आणखी एका माध्यमातून मराठी सिनेमाशी निगडीत असणार आहे. माधुरीचा आगामी सिनेमा ’१५ ऑगस्ट’ नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय. या सिनेमाचं स्किनिंग नुकतंच पार पडलं. यावेळी आशा भोसले यांची उपस्थिती लक्षणीय होती. माधुरीच्या आर एन एम प्रोडक्शनने या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाबद्द्ल माधुरी म्हणते, या सिनेमाच्या कथानकापासून ते पूर्णत्त्वापर्यंतचा संपूर्ण प्रवास मी छान अनुभवलाय. खुपच उत्साही होतं हे प्रोजेक्ट. मला पुन्हा अशी मराठी सिनेमाची निर्मिती करायला आवडेल.’ या सिनेमात मृण्मयी देशपांडे, सतीश पुळेकर, आदिनाथ कोठारे, राहुल पेठे, वैभव मांगले, जयंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत जुहुमधील पीव्हीआर इथं या सिनेमाचं स्क्रिनिंग पार पडलं. हा सिनेमा २९ मार्च ला नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.

 

 

Recommended

Loading...
Share