ब्युटी क्वीन मानसी नाईकचा लग्नावेळी असा असणार लूक, वाचा सविस्तर

By  
on  

अभिनेत्री मानसी नाईकने यावर्षी तिच्या वाढदिवसाला तिच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं. मानसीने सोशल मिडीयावर प्रेमाची कबुली दिली. प्रदीप खरेरासोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिने सगळ्यांना सांगितलं.  आता ही जोडी येत्या 19 जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकते आहे. एरवी सोशल मिडियावर आपले सुरेख लूक्स शेअर करणारी मानसी लग्नासाठी कोणता लूक ट्राय करणार याची उत्सुकता आहे.

 

 

मानसीने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या लग्नातील लूकविषयी शेअर केलं आहे. मानसी लग्नात जोधा अकबरमधील ऐश्वर्या रायचा लूक करणार आहे. मानसी ऐश्वर्याची खुप मोठी फॅन आहे. अनेकदा ती ऐश्वर्याच्या लूकमधील फोटो चाहत्यांशी शेअर करत असते.

Recommended

Loading...
Share